ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance Fraud | शेतीच्या नावाखाली फसवणूक! बनावट पीकविमा प्रकरणात ११ सीएससींचे परवाने रद्द आणि शेतकऱ्याला..

Crop Insurance Fraud | Fraud in the name of agriculture! Licenses of 11 CSCs canceled in fake crop insurance case and farmer..

Crop Insurance Fraud | खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा उतरवण्याची सोपस्कार राज्य शासनाने केली आहे. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेऊन काही सार्वजनिक सेवा केंद्रांनी (सीएससी) शेतकऱ्यांच्या नावाने (Crop Insurance Fraud) बनावट विमा प्रस्ताव दाखल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राज्यातील ११ सीएससी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या संयुक्त कारवाईतून हा प्रकार उघडकीस आला. चौकशीअंती जवळपास आठ हजार ९१६ बनावट विमा प्रस्ताव आढळून आले. या प्रस्तावांमध्ये ४८ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन विमा संरक्षित असल्याचे दाखविण्यात आले होते. याचा अर्थ शासनाला (fake insurance claims) या बनावट प्रस्तावांमुळे जवळपास ३८ कोटी ५६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार होता.

वाचा : Shiv Sena Shinde Group | शिवसेना फुटण्याच्या प्रकरणात शिंदे गटाचा विजय; ठाकरे गटाला मोठा धक्का

या गैरप्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होता :

  • शेतजमीन नसतानाही पीकविमा काढणे.
  • शेतकऱ्यांची संमती न घेताच त्यांच्या नावाने बनावट प्रस्ताव दाखल करणे.
  • महापालिका, नगरपालिका किंवा औद्योगिक क्षेत्रातील बिगरशेती जमिनीवर पीकविमा उतरवणे.
  • सातबारावर नोंद असलेल्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन दाखवून विमा काढणे.

या प्रकरणामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येऊ शकला असता. मात्र, चौकशीमुळे हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने कोट्यवधींचा तोटा टळला आहे. तसेच, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

पीकविमा योजनेचा हेतू शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक आधार देणे हा आहे. या (subsidy abuse) योजनेचा गैरफायदा टाळण्यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपन्या सतर्क असल्याचे या कारवाईवरून दिसून येते. त्याचबरोबर सीएससी केंद्रांनाही शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून योजनेचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या बातमीमुळे शेतकऱ्यांना बनावट पीकविमा प्रस्तावाबाबत जागरूकता निर्माण होईल आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा.

Web Title | Crop Insurance Fraud | Fraud in the name of agriculture! Licenses of 11 CSCs canceled in fake crop insurance case and farmer..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button