कृषी सल्ला

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४७२ कोटींची पीकविमा भरपाई

Good news for farmers! 472 crore crop insurance compensation to the farmers of 'Ya' districtGood news for farmers! 472 crore crop insurance compensation to the farmers of 'Ya' district

Crop Insurance | नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे आकडेवारीनुसार १० लाख ५७ हजार ५०८ शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा (Crop Insurance) उतरविला होता. या पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ४७२ कोटी ५१ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. या भरपाईपैकी ३६६ कोटी ५० लाख रुपये अधिसूचनेनुसार आणि १०६ कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम
शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, खरीप ज्वारी, कापूस व तूर पिकांसाठी मिड सीझन डायव्हर्सिटीची अधिसूचना लागू केली होती. या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने ३६६ कोटी ५० लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत प्राप्त पूर्वसूचनांचे पंचनामे करून तिसऱ्या हप्त्यात अनुक्रमे ९९ कोटी ६५ लाख रुपये व ६ कोटी ३६ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे.

वाचा : Crop insurance | बिग अपडेट: पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासात पीकविमा योजनेकडे करा तक्रार; नाहीतर नाही मिळणार पीकविमा; पहा कस कराल तक्रार…

शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये
पीक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पीकविमा ज्या महसूल मंडलांना लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येईल. या व्यतिरिक्त ७५ टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पीकविमा योजनेत नाही. शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी पीकविम्याचे महत्त्व
पीकविमा ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संजीवनी आहे. पीकविम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि ते शेती व्यवसायात अधिक आत्मविश्वास बाळगू शकतात. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली होती. पीकविम्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आणि त्यांना आर्थिक मदत मिळाली.

शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवणे आवश्यक
शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवणे आवश्यक आहे. पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीशी संपर्क साधावा आणि पीकविमा उतरवावा.

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! 472 crore crop insurance compensation to the farmers of ‘Ya’ districtGood news for farmers! 472 crore crop insurance compensation to the farmers of ‘Ya’ district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button