Flying Car in India | आकाशात उडणारी इलेक्ट्रिक गाडी! वाचा मारुती सुझुकीची नवीन कार हवेत उडणारी कार लाँच..
Flying Car in India | Electric car flying in the sky! Read Maruti Suzuki's New Car Flying Car Launch..
Flying Car in India | वाहन क्षेत्रात नेहमीच धाडसी प्रयोग करणारी (Flying Car in India) मारुती सुझुकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी त्यांच्या चर्चेत असलेल्या गोष्टी आहेत – उडणारी कार आणि नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही!
उड्डाण करणारी कार – स्वप्न सत्यात होणार?
व्हायब्रंट गुजरातमध्ये मारुती सुझुकीने त्यांच्या फ्लाइंग कार कॉन्सेप्टचे प्रदर्शन केले. जपानी स्टार्टअप स्कायड्राइव्हसोबत भागीदारी करून तयार करण्यात आलेली ही ‘स्कायकार’ नावाची बहु-रोटर विमानासारखी आहे. शहरी भागात जिथे विमानतळ बांधणे कठीण आहे, तिथे इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी (Flying Car) सेवा सुरू करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. या कारची खासियत आहे की ती इमारतींच्या छतावर उतरू शकते आणि पुन्हा उड्डाण करू शकते.
मारुती ईव्हीएक्स – इलेक्ट्रिक क्रांतीची तयारी!
भारतातील टेस्टिंग दरम्यान मारुतीची येणारी (Maruti Suzuki electric SUV) इलेक्ट्रिक एसयूव्ही पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ती चार्जिंग स्टेशनवर चार्ज करताना दिसली. ही गाडी 2025 च्या एप्रिलपर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. अंदाज आहे की, याची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. ही 5 सीटर कार असून त्यात पाच प्रवासी सहज बसू शकतात.+
वाचा : Women Budget 2024 | आनंदाची बातमी ! शेतकरी महिलांना अर्थसंकल्पात महिलांना होणारा मोठा फायदा जाणून घ्या कसा सविस्तर
60 किलोवॅट बॅटरी पॅक आणि ड्युअल मोटर सेटअपसह ही गाडी 550 किलोमीटरपर्यंत धावू शकते. मोठा कनेक्टेड स्क्रीन सेटअप, वायरलेस फोन चार्जिंग आणि 360 डिग्री कॅमेरा हे या गाडीचे काही आकर्षक फीचर्स असतील. लाँच झाल्यानंतर ही गाडी ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक आणि एमजी झेडएस ईव्हीला टक्कर देईल, तसेच महिंद्रा एक्सयूव्ही 400 ईव्ही आणि टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकपेक्षा अधिक प्रीमियम पर्याय असेल.
मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki EV launch date) या घोषणांनी निश्चितच वाहन क्षेत्रात खळबळ माजवली आहे. फ्लाइंग कार ही भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते आणि मारुती सुझुकीने या क्षेत्रात प्रवेश केल्याने भारतात या तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळेल. तसेच, मारुती ईव्हीएक्स ही भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराला गती देण्यास मदत करेल.
Web Title | Flying Car in India | Electric car flying in the sky! Read Maruti Suzuki’s New Car Flying Car Launch..
हेही वाचा