Crop Insurance | गुडन्यूज! ‘या’ जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० कोटींचा पीक विमा जमा; तुम्हाला मिळाले का?
धाराशिव: २०२२ खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी(Crop Insurance) धाराशिव जिल्ह्यातील ५४ हजार ७२७ शेतकऱ्यांना दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. गुरुवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
मोहा, पाडोळी, सावरगाव, अनाळा, सलगरा आणि सोनारी(Crop Insurance) या सहा मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांच्या माहितीनुसार, आगामी दोन दिवसात ५० कोटी ५० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
केवायसी पूर्ण करा
पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे. मात्र,(Crop Insurance) ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांनी त्वरित पूर्ण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
लांब प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या रकमेमुळे नुकसानीची भरपाई होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल.