ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Damage Compensation | आनंदाची बातमी! अतिवृष्टीचा तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Good news! Heavy rains amounting to so much crores in the accounts of 3 lakh farmers

Crop Damage Compensation | शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यापैकीच एक असणारी मोठी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय. तर शेतकरी मित्रांनो गेल्यावर्षी अनेक भागांत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद करून निधिस मंजुरी देण्यात आली होती. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

वाचा : Business Idea | शेतकऱ्यांनी मसाल्यांचा व्यवसाय केल्यास मिळेल भरघोस नफा! कमाई जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

3 lakh farmers’ accounts of heavy rains deposited 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता. या निधीतून पहिल्या टप्प्यात अनुदान तब्बल 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. हा निधी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संगणकीय प्रणालीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आला आहे.
Soon the funds will be deposited in the remaining farmers’ accounts लवकरच बाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी होणार जमा
गेल्यावर्षी जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याचसाठी शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई खात्यात वर्ग केली जात आहे. तर या निधीचे मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीमार्फत वितरण सुरु आहे. आता हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याचबरोबर पुढील शुक्रवारपर्यंत 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 178 कोटी 25 लाख इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: Good news! Heavy rains amounting to so much crores in the accounts of 3 lakh farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button