ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Farmer Compensation Fund| गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केला निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्याला मिळाले 10 कोटी

Farmer Compensation Fund | राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली होती. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसानं हजेरी लावली. त्यात फळबागा आणि अन्य शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

काय आहे निर्णय

राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.


दिनांक 4 ते 8 मार्च व दि.16 ते 19 मार्च, 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसानं शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस ही राज्य शासनानं घोषित केलेली आपत्ती आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालं असल्यास जेवढ्या क्षेत्राचं नुकसान झालं आहे
तेवढ्या क्षेत्राकरता अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. 

विभागनिहाय निधी

पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार आणि अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार अशाप्रकारे निधीचं वाटप करण्यात आलं आहे. सबंध राज्यासाठी एकूण वितरीत केलेला निधी आहे १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये इतका.

या जिल्ह्याला मिळाले दहा कोटी

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी हे तीन तालुके. या तीन तालुक्यात 6 हजार 526 शेतकऱ्यांच्या 3 हजार 838 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. तर मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं गंगाखेड, परभणी, पूर्णा, जिंतूर, सोनपेठ, पालम या तालुक्यांतील जवळपास सहा हजार शेतकऱ्यांच्या 3 हजार 960.81 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. जिल्हा प्रशासनानं बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साडे सहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. या जिल्ह्यांना सरकारनं दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button