ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Damage | ब्रेकिंग! अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Crop Damage | राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून चार दिवसापूर्वीच राज्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिट (Crop Damage) होण्याचा अंदाज वर्तवला होता. याचं अंदाजानुसार राज्यामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस (Crop Damage) कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावत आहे. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही निर्देश दिले आहेत.

वाचानादचखुळा! आता शेतकरी शेती आणि पशुपालनातून कमावणार लाखोंचा नफा, केंद्राच्या ‘या’ योजनांचा घ्या लाभ

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेत महसूल यंत्रणेस तातडीने नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेत प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या आहेत.

शेती पिकांचे नुकसान
राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धिंगाणा काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे शेती (Agricultural Information) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पाऊस अवकाळी पावसाळी हजेरी लावली. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालय. याचं पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री गंभीरपणे दखल घेत तातडीने कामाला लागले आहेत.

वाचा:शेतकऱ्यांनो फक्त 2 हजारांत मिटणार 50वर्षांच्या जमिनीचा वाद! तोही एका झटक्यात; सरकारच्या ‘या’ योजनेतून करा अर्ज

कृषिमंत्र्यांनीही दिले आदेश
अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture Maharashtra) पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा आर्थिक फटका मिळाला आहे. याचमुळे अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Tittle: Breaking! Immediate panchnama of agricultural crops affected by unseasonal rains, important instructions of Chief Minister

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button