ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Damage | या २ जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ९९ कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर

Crop Damage | 99 crore 78 lakhs sanctioned for crop damage due to unseasonal rains in these 2 districts

Crop Damage | नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टोमॅटो, मका, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या (Crop Damage) नुकसानीची पाहणी करून कृषी विभागाने अंतिम अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार शासनाने (Maharashtra farmer relief fund) ९९ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी येत्या काही दिवसांतच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल.

जिल्ह्यातील ८९० गावांतील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला होता. यातील ६५ हजार ८४९ बाधित शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक नुकसान द्राक्ष पंढरीत झाले. सुमारे ११ हजार ५९७ हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्यानंतर कांदा पिकाचे नुकसान झाले. साडेदहा हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले.

वाचा : Self Help Group Loans | ग्रामीण स्वयं-सहायता गटांसाठी बूस्टर डोस! एसबीआयसोबत करार, आता कर्ज मिळणार सोपे आणि जलद!

शासनाने नोव्हेंबरमधील नुकसानीसाठी सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत वितरित होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरून हा निधी वितरित करायचा आहे. (Compensation for unseasonal rains) नैसर्गिक आपत्ती निधीमधून बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी एक रुपयाही वसुली करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या निर्णयानुसार (Nasik agriculture department) नाशिक विभागासाठी एक लाख ७ हजार ४९१ बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी, दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात सर्वाधिक निधी नाशिक जिल्ह्यातील ६५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९९ कोटी ७८ लाखांचा मंजूर झाला आहे. त्या खालोखाल नगर जिल्ह्यातील २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाखांचा निधी मिळणार आहे.

या निधीमुळे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Web Title : Crop Damage | 99 crore 78 lakhs sanctioned for crop damage due to unseasonal rains in these 2 districts

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button