ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Self Help Group Loans | ग्रामीण स्वयं-सहायता गटांसाठी बूस्टर डोस! एसबीआयसोबत करार, आता कर्ज मिळणार सोपे आणि जलद!

Self Help Group Loans | A booster dose for rural self-help groups! Agreement with SBI, now easy and fast to get loan!

Self Help Group Loans | ग्रामीण विकास मंत्रालय आणि भारतीय स्टेट बँकेने बुधवारी रोजी ग्रामीण स्वयं-सहायता गटांसाठी उद्यमशीलता अर्थसहाय्य सुलभ करण्यासाठी करार केला आहे. (Self Help Group Loans) या कराराद्वारे एसएचजींच्या महिला उद्योजकांना सुलभ आणि जलद कर्ज मिळणार आहेत.

या करारावर दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंह आणि (*SBI loans) भारतीय स्टेट बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिस मुंबईचे मुख्य महाव्यवस्थापक शांतनु पेंडसे यांनी स्वाक्षरी केली.

एसबीआयने विशेषत: एसएचजी महिला उद्योजकांसाठी ‘स्वयं सिद्ध’ नावाचे कर्ज उत्पादन तयार केले आहे. यातून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. या (Self-help group loans India) कर्ज प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या कागदपत्राचा वाढता भार कमी करून आणि कर्ज मंजुरीचा वेळ कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आता जटिल कोटेशन किंवा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर)ऐवजी स्थानिक एसबीआय शाखांमध्ये केवाईसी तपशीलांसह साधे कर्ज अर्ज दाखल करता येणार आहेत. दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) कर्ज अर्ज प्रक्रियेची सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आणि त्यांच्या समर्पित फील्ड कادाद्वारे कर्जाची परतफेड व्हावी याकडे लक्ष देणार.

वाचा : Reliance Mango Refinery | रिलायन्स रिफायनरीच्या आंब्यांची गोष्ट – भारताचा फळराजा कसा झाला?

याच कार्यक्रमात औपचारिक अर्थसहाय्याकडे महिलांचा प्रवेश वाढविण्यासाठी प्रशिक्षण साहित्य संच देखील प्रकाशित करण्यात आला. हा संच विश्व बँकेने निधी पुरवठा केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक रूपांतरण प्रकल्प (एनआरईटीपी) अंतर्गत आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (आयएफसी)च्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या संचाचा उद्देश राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांना (एसआरएलएम) अधिक सक्षम करणे आहे जेणेकरून एसएचजी सदस्यांना त्यांच्या उद्योगांसाठी औपचारिक अर्थसहाय्य मिळण्याचे प्रमाण वाढविता येईल.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेल्या स्वयं-सहायता गटांना या कराराची मोठी आस आहे. कर्ज प्रक्रिया सोपी होणे आणि औपचारिक अर्थसहाय्य हाताळण्याची क्षमता वाढणे यामुळे महिला उद्योजकांचा आत्मविश्वास वाढणार आहे तसेच त्यांच्या उद्योगांना पंख फुटणार आहेत. हा करार ग्रामीण भारताचे आर्थिक चित्र उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच हातभार लावणार!

Web Title | Self Help Group Loans | A booster dose for rural self-help groups! Agreement with SBI, now easy and fast to get loan!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button