कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

KissanGPT| शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा, विकसित झालं ‘हे’ नवीन तंत्रज्ञान; ‘या’ भारतीय शास्त्रज्ञाची करामत

KissanGPT | सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं प्रत्येक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झालेली आहे. नुकतंच आलेलं एक तंत्रज्ञान म्हणजे चॅट जीपीटी. चॅट जीपीटीनं सगळं जग हादरवून सोडलं आहे. एलॉन मस्क इत्यादी व्यक्तींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कमी करायला हवा असा सल्ला दिला आहे. हे जरी खरं असलं तरी यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. संगणक शास्त्रज्ञ प्रतीक देसाई यांनी किसान जीपीटी हा नवीन चॅटबॉट तयार केला आहे. कृषी प्रधान भारताला याचा मोठा फायदा होणार आहे.

काय आहे Kissan GPT

भारतीय शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी Kissan GPT नावाचा नवीन एआय-चॅटबॉट (AI Chatbot) लॉन्च करण्यात आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले प्रतिक देसाई यांनी हे विकसित केलं आहे.  हे सर्वात आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. हा चॅटबॉट भारतातील नऊ भाषांमध्ये शेतीविषयक चर्चा करू शकणार आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञासोबत संवाद तोही मातृभाषेत होणार आहे. भारत एक कृषी प्रधान देश आहे. हा एआय चॅटबॉट शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरु शकतो. शेतीत येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन काढण्यास हे तंत्रज्ञान मदत करु शकेल.

टाटाच्या ‘या’ गाड्या घेणार नवीन रुप, बाजारात होणार ग्रँड एन्ट्री; काय आहेत फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

असा मिळणार सल्ला

शेतकऱ्यांना सल्ल्यासाठी एक तर सरकारवर किंवा खाजगी संस्थांवर अवलंबून राहावं लागत. मात्र आता हा सल्ला घर बसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. यामार्फत सिंचन, पीक लागवड, कीड नियंत्रण आणि इतर शेतीशी संबंधित विषयांवर योग्य वेळी सल्ला देऊ शकते. स्मार्टफोन द्वारे शेतकरी चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या Kissan GPT च्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होईल.

काय आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

KissanGPT चा वापर याआधी काही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. पिकांबद्दल योग्य निर्णय घेण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत झाली असं काही शेतकऱ्यांनी याच्या वापरानंतर म्हटलं आहे. भारतातील शेतकरी अधिकाधिक नवनवीन तंत्रज्ञान, KissanGPT कडे वळत आहेत. हे चॅटबॉट आता शेतकर्‍यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button