ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जबरदस्त घोषणा; जाणून घ्या पीएम किसानची रक्कम वाढली का?

PM Kisan | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा बॉक्स (Financial) उघडला आहे. त्यातून प्रत्येकजण आपापल्या सुखाचा वाटा (PM Kisan Yojana)शोधत असतो. यामध्ये सर्वांबाबत काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या अर्थसंकल्पाने (Budget 2023) देशाच्या अन्नदात्यासाठी काय आणले आहे आणि (Farming) शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीएम किसान (PM Kisan Yojana) सन्मान निधीमध्ये वाढ झाली आहे की नाही. चला तर मग जाणून घेऊयात.

अर्थमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
• शेतकर्‍यांना मिळणारी कर्जातील (Loan) सूट कायम राहील.
• कृषी क्षेत्रात स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी डिजिटल एक्सीलरेटर फंड तयार केला जाईल, त्याला कृषी निधी असे नाव देण्यात येईल.
• क्रेडीट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 20 हजार कोटींपर्यंतचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
• डिजिटल शेतीला चालना दिली जाईल.
• शेतकऱ्यांना डिजिटल शेतीशी जोडण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
• सेंद्रिय शेतीसाठी पंतप्रधान प्रणाम योजना सुरू करण्यात येणार आहे.
• हरित विकासावर सरकारचा भर असेल.
• बायोगॅस प्रकल्प उभारले जातील.
• शेतकऱ्यांसाठी सहकार मॉडेल राबविण्यात येणार आहे.

• नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
• हरित कर्ज कार्यक्रम सुरू केला जाईल.
• गोवर्धन योजनेसाठी 500 नवीन प्लांट उभारण्यात येणार आहेत.
• नैसर्गिक शेतीसाठी 10,000 बायो इनपुट रिसर्च सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.
• हरित विकासावर भर दिला जाईल.
• कृषी प्रोत्साहन निधीची घोषणा.
• फळबाग शेतीवर सरकारचा भर राहील. त्यासाठी 22शे कोटींची मदत दिली जाणार आहे.
• पंतप्रधान मत्स्य योजनेचा निधी वाढवण्यात येणार आहे.
• मिस्टी योजनेंतर्गत खारफुटीच्या शेतीला चालना दिली जाणार आहे.

पीएम किसानची रक्कम वाढली का?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य मिळते. यावेळी अर्थसंकल्पातून पीएम फार्मरची रक्कम वार्षिक 6 हजारांवरून 8 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती. मात्र, याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 6 हजार रुपये हप्ता मिळत राहतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Huge announcement for farmers in budget; Know PM Kisan amount increased

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button