ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Budget 2023 | शेतकऱ्यांच्या पोरांनो आता दणकून कमवा! निर्मला सीतारामन यांनीच अर्थसंकल्पात आयकरात दिलीय ‘इतकी’ सूट…

Budget 2023 | मोदी सरकारने (Income Tax Budget 2023) चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात (Financial) दिलासा मिळण्याची आशा लोकांना होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये निर्मला सीतारामन यांनीही आयकराबाबत (Income Tax Budget 2023) महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील जनता बऱ्याच दिवसांपासून आयकरात सूट मिळण्याची वाट पाहत होती. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरात (Income Tax) सूट जाहीर केली आहे.

आयकरात सवलत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांच्या फायद्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये, प्राप्तिकराच्या (Income Tax) संदर्भात, अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक (Financial) उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट 5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती. यासोबतच आयकर स्लॅबमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. पगारदारांना याचा फायदा होणार आहे.

आयकर स्लॅब
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “2020 मध्ये मी 2.5 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या 6 उत्पन्न स्लॅबसह नवीन वैयक्तिक आयकर प्रणाली सुरू केली. आता या प्रणालीतील कर रचना बदलण्याचा, स्लॅबची संख्या 5 पर्यंत कमी करण्याचा आणि कर सवलतीची मर्यादा 3 लाख रुपये करण्याचा माझा प्रस्ताव आहे.”

कृषी बातम्या, आयकर बजेट 2023, आयकर सूट , निर्मला सीतारामन,

हे आहेत नवीन स्लॅब
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक आयकर सांगितले. “नवीन कर दर रुपये 0 ते 3 लाख – शून्य, रु. 3 ते 6 लाख – 5%, रु. 6 ते 9 लाख – 10%, रु. 9 ते 12 लाख – 15%, 12 ते 15 लाख रुपये – 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त – 30% कर लागू होईल.

Web Title: Budget 2023 | Farmers’ sons earn a bang now! It is Nirmala Sitharaman who has given exemption in income tax in the budget

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button