ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Bank Loan | आता स्वतःचा व्यवसाय सुरू करा जोमात ; या योजनेत सहभागी होऊन मिळवा विनातारण ५ कोटींचे कर्ज…

Bank Loan|कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नंतरच्या काळात लोकांनी स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला आहे. आता उद्योग सुरू करायचा म्हंटल्यावर भांडवल आलेच ! सरकार सुद्धा लोकांना व्यवसाय (Buisness) सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते. यासाठी विविध योजना देखील जाहीर केल्या जातात.

५ कोटींचे कर्ज मिळणार

सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण भांडवल उभारणीसाठी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो ऍण्ड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेची मर्यादा नुकतीच दोन कोटींवरुन पाच कोटी रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ यापुढे उद्योगांना ५ कोटींपर्यंतचे विनातारण कर्ज (Bank Loan) मिळणार आहे. (CGTMSE)

गॅरंटी शुल्क सुद्धा द्यावे लागणार नाही

१ एप्रिल पासून हा बदल अंमलात आणण्यात आला आहे. याआधी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो ऍण्ड स्मॉल एंटरप्रायझेस योजनेत कर्जदाराला गॅरंटी शुल्क ( Granaty Charges) द्यावे लागत होते. हे गॅरंटी शुल्क २ ते ३ टक्क्यांपर्यंत घेतले जात होते. परंतु आता हे गॅरंटी शुल्क कर्जदारांकडून न घेता बॅंकांकडून घेण्यात येणार आहे.

Documents | योजनेत सहभागी लागणारी कागदपत्रे

१) योजनेचा अर्ज
२) कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
३) बिजनेस रिपोर्ट
४) सीजीटीएमएसई लोन कव्हरेज पत्र
५) बँकेकडून घेतलेल्या कर्जाची कागदपत्रे
६) ओळखपत्र
७) फोटो

म्हणून योजनेत बदल केले

या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे बदल करण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारच्या लघु व सूक्ष्म उद्योगांना आणि व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बँका कर्ज (Loan) देण्यास हात आखडता घेत आहेत, यामुळे या योजनेला व्यावसायिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून या योजनेकडे व्यवसायिकांचे लक्ष वळवण्यासाठी योजनेत बदल करण्यात आलेले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Banks will give loan of 5 crores for buisnesses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button