ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

AHDF KCC 2023 | देशातील २७ लाख पशुउत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने राबविले विशेष अभियान; असा होणार फायदा

AHDF KCC 2023 | देशातील बहुतेक शेतकरी शेतीसोबत इतर पूरकव्यवसाय करतात. मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, पशुपालन यांसारख्या व्यवसायांचा समावेश यामध्ये होतो. हे व्यवसाय केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. (Financial) दरम्यान केंद्रसरकार व राज्यसरकार सुद्धा असे व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते. यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. तसेच मोठी अनुदाने दिली जातात.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना

पशु किसान क्रेडिट कार्ड ही सरकारची एक म्हत्त्वकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावेत. या व्यवसायांसाठी त्यांना आर्थिक भांडवल मिळावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड देण्यात येते. ( Animal Kisan Credit Card) या कार्डच्या माध्यमातून पशुपालकांना जनावरांच्या देखभालीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

सरकारने राबविली विशेष मोहीम

केंद्र सरकारची ( Central Government) ही योजना आधी फार मर्यादित राज्यांसाठी होती. मात्र आता देशातील सर्व पशुपालन, मत्स्यपालन व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड चा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचली जावी, यासाठी सरकारने विशेष मोहीम राबविली आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड अभियान

देशातील पशुपालन, मत्स्यपालन व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पशु किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी केंद्रसरकारने ‘AHDF Kcc 2023’ म्हणजेच पशु किसान क्रेडिट कार्ड अभियान राबविले आहे. या अभियानाअंतर्गत देशातील २७ लाख शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे.

या काळात कार्डचे वाटप होणार

‘पशु किसान क्रेडिट कार्ड अभियान’ राबविण्यासाठी पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग व वित्तसेवा विभाग यांचे सहकार्य असणार आहे. या विभागांच्या सहकार्यातून १ मे २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात पशु किसान क्रेडिट कार्डचे वितरण केले जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Government announced campaign for farmers buisnesses named as AHDF Kcc 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button