ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेती

Mango Species | ऐकावं ते नवलंच! एका झाडावर चौदा आंब्यांच्या जाती…

Mango Species|शेती व्यवसायात हल्ली नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. या प्रयोगाचे कृषी क्षेत्रात कौतुक केलं जातं. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या हंगामात आंब्याला अधिक मागणी पहायला मिळते. फळांचा राजा आंबा हे पीक वर्षातून एकदा चाखायला मिळते. पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी बऱ्याचदा अंबरस चापतीचा बेत पहायला मिळतो. बऱ्याचदा चाकरमानी हे आंबे विकत घेण्यासाठी कोंकण भागात जाताना दिसतात. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, आंब्याच्या एकाच झाडावर १४ वेगवेगळ्या जातीचे आंबे उगवले आहेत, नाही ना. पण गुजरातमधील एका व्यक्तीने हे शक्य केलं आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो काळजी घ्या, साठवलेल्या कापसामुळे होतोय ‘हा’ गंभीर आजार…

असाच एक वेगळा प्रताप गुजरामधील धारी तालुक्यातील डितला गावातील केसर उकाभाई भोटी या शेतकऱ्याने केसरी आंब्याच्या १४ प्रकारच्या जातींचे उत्पादन घेतले आहे. आंब्याच्या एकूण १४ जाती या ७० च्या दशकातील आहेत. या जाती त्यांनी एकच झाडावर पिकवल्या आहेत. भाटी हे केसर आंब्याचे उत्पादक असेल तरीही त्यांनी एकाच झाडावर १४ प्रकारच्या आंब्यांचे उत्पादन घेतले आहे.

एवढंच नाही तर या झाडाला होळीपासून ते दिवाळीपर्यंत आंबे येतात. हे काही प्रमाणात पहायला मिळतेय. ७० व्या दशकातील जेवढ्या आंब्याच्या जाती होत्या तेवढ्या आंब्याच्या जातीतून केवळ केसरी आंब्याची जात आजही आहे. या आंब्याच्या इतर चौदा जाती या पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आल्या आहेत.

चौदा आंब्याच्या जाती :

नलियेरो, गुलाबीयो, सिंदोरीयो, दादमो, कालो जमादार, कॅप्टन, पायलट, वरियालियो, बदाम, सरदार, श्रावणीयो, आषाढियो यांसारख्या जातींचा समावेश आहे. नवाबांच्या काळात आंब्याच्या २०० पेक्षा जास्त जाती होत्या. पण त्यातील केसर हीच जात आजपर्यंत टिकून आहे आणि तितकीच लोकप्रियता आहे, असे भाटी यांनी सांगितले.

तसेच या चौदा आंब्यांच्या जातींबद्दल लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने या झाडाची निर्मिती करण्यात आली. इतरही ४४ प्रकरचे आंबे असलेले एक झाड होते, मात्र त्या आंब्याच्या जातीचे झाड नैसर्गिक कारणाने मरण पावल्याचे सांगितले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button