ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Atal Bambu Samriddhi Yojna | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! “या” योजनेअंतर्गत सरकार देते तब्बल ५० टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर ..

Atal Bambu Samriddhi Yojna | Happy news for farmers! Under "this" scheme, the government gives as much as 50 percent subsidy; Know in detail..

Atal Bambu Samriddhi Yojna | केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवली जात होती, परंतु रोपांची देखभाल करण्यासाठी कोणतेही अनुदान दिले जात नव्हते. आता, राज्य सरकारने “अटल बांबू समृद्धी योजना” (Atal Bambu Samriddhi Yojna) नावाची नवीन योजना राबवून या समस्येचे निराकरण केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार, टिश्यू कल्चर बांबू रोप पुरवठा आणि देखभालीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षांसाठी प्रति रोप ₹३५० खर्च अपेक्षित आहे. यापैकी ५० टक्के रक्कम, म्हणजेच ₹१७५, राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल.

अनुदानाची विभागणी खालीलप्रमाणे असेल:

  • पहिले वर्ष: ₹९०
  • दुसरे वर्ष: ₹५०
  • तिसरे वर्ष: ₹३५

वाचा | Budget 2024 | ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अन् बरचं काही, वाचा शेतकऱ्यांसाठी काय केल्या अर्थसंकल्पात घोषणा…

या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला २ हेक्टर क्षेत्रासाठी ६०० बांबू रोपं दिली जातील. रोपांची लागवड ५ बाय ४ मीटर अंतरावर करावी लागेल. (Atal Bambu Samriddhi Yojna) बांबू लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेचे फायदे:

  • शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे आणि देखभालीसाठी अनुदान मिळेल.
  • बांबू ही जलदगतीने वाढणारी आणि बहुउपयोगी पिक आहे.
  • बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
  • बांबू लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

अर्ज कसा करावा:

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल. शेतकऱ्यांनी महा वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जिल्हा कृषी कार्यालयातून अर्ज करू शकतील.

अधिक माहितीसाठी:

Web Title | Atal Bambu Samriddhi Yojna | Happy news for farmers! Under “this” scheme, the government gives as much as 50 percent subsidy; Know in detail..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button