Government Decision | दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठ्या घोषणा
Government Decision | Big announcements from Deputy Chief Minister Ajit Pawar for milk farmers
Government Decision | अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, (Government Decision) राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे.
दुग्ध उत्पादकांना दिलासा
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, दूध उत्पादक शेकऱ्यांसाठी प्रतिलिटर 5 रुपयांचं अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रतिदिन 1 कोटी 60 लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी 283 कोटींची आवश्यकता आहे. यापैकी 204 कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.
वाचा | PM Surya Ghar Yojna | पंतप्रधान मोदींच्या ‘या’ मोफत वीज योजनेला ला मंजुरी!
इतर महत्वाच्या घोषणा
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आशा स्वयंसेविका मानधन, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ.
- नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत.
- शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा.
- नमो शेतकरी सन्मान निधी.
- गरीब-गरजूंना आनंदाचा शिधा.
या महत्वाच्या घोषणांमुळे राज्यातील विविध घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Web Title | Government Decision | Big announcements from Deputy Chief Minister Ajit Pawar for milk farmers
हेही वाचा