आर्थिक

Budget 2024 | ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अन् बरचं काही, वाचा शेतकऱ्यांसाठी काय केल्या अर्थसंकल्पात घोषणा…

Budget 2024 | 'Magel Aye Solar Agriculture Pump Yojana' and many more, read what has been done for farmers announced in the budget...

Budget 2024 | महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (२७ फेब्रुवारी २०२४) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

शेतकऱ्यांसाठी घोषणा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना:
या योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार सौर कृषी पंप बसवण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना विजेची बचत होईल आणि सिंचनाची सुविधाही उपलब्ध होईल.
पीएम कुसुम योजना: यंदा या योजनेअंतर्गत राज्यात १ लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७८ हजार ७५७ पंप बसवण्यात आले आहेत.

वाचा | Sugarcane Rate | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! ऊस खरेदी दरात तब्बल 8 टक्के वाढ; जाणून घ्या प्रतिक्विंटल किती रुपयांनी वाढणार?

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजना: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
जिरेवाडी येथे सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र: परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठा अंतर्गत परळी येथील जिरेवाडी येथे सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन विद्यालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
याशिवाय, अर्थसंकल्पात पर्यटन, रस्ते, रेल्वे, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांसाठीही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

Web Title | Budget 2024 | ‘Magel Aye Solar Agriculture Pump Yojana’ and many more, read what has been done for farmers announced in the budget…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button