Kharif Crop Insurance | खरीप पीक विमा योजनेत मोठा बदल! आधार क्रमांक लिंक नसेल तर नुकसानभरपाई मिळणार नाही..
Kharif Crop Insurance | Big change in Kharif crop insurance scheme! No compensation will be given if Aadhaar number is not linked.
Kharif Crop Insurance | खरीप पीकविमा योजनेत नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देताना त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Kharif Crop Insurance) यामुळे बनावट अर्जदारांना चाप बसणार असून, योग्य लाभार्थ्यालाच नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
यापूर्वी आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला नसल्याने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्याला मिळत नव्हती. ही रक्कम तशीच पडून राहत होती. त्याचबरोबर, अनेक बनावट अर्जदारांनी दुसऱ्याच्या नावावरील शेती दाखवून स्वतःच अर्ज केल्याचे आढळून आले होते. अर्ज करताना बँक खाते क्रमांक स्वतःचा ठेवून अन्य तपशील संबंधित शेतकऱ्याचा कायम ठेवला होता. त्यामुळे नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्याच्या नावावर दिसत असली तरी प्रत्यक्ष रक्कम मात्र, बनावट अर्जदाराच्या खात्यावर जमा होत होती.
वाचा : Earthquake | भारतात भूकंपाची तलवार डोक्यावर? जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रातील आपल्या राज्याची जोखीम…
त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने आधार क्रमांक जोडलेले बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बनावट अर्जदारांना चाप बसणार असून, योग्य लाभार्थ्यालाच नुकसानभरपाई मिळेल.
राज्यात बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेत आधार क्रमांकाला जोडलेले आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आधार क्रमांक जोडण्यासाठी अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता नाही.
या निर्णयामुळे खरीप पीकविमा योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना होण्यास मदत होईल.
हेही वाचा :
Web Title : Kharif Crop Insurance | Big change in Kharif crop insurance scheme! No compensation will be given if Aadhaar number is not linked..