Crop Insurance | दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना झटका! सरकारचे नुसते फसवे धंदे; पिक विम्याची अग्रीम रक्कम खात्यात नाहीतर कागदावरच
Farmers shocked on the occasion of Diwali! Government's mere deceitful business; Advance amount of pick insurance in account or on paper only
Crop Insurance | अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या अग्रीम रक्कम खात्यात नाहीच..
मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
वाचा : Diabetes Control | दिवाळीत मिठाई खाऊनही मधुमेह नियंत्रणात कसा ठेवायचा जाणून घ्या सविस्तर ..
शासनाने अग्रीम रक्कम मिळण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक
विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळावी यासाठी शासनाने त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
Web Title: Farmers shocked on the occasion of Diwali! Government’s mere deceitful business; Advance amount of pick insurance in account or on paper only