भेंडी पिकावरील रोग व उपाय योजना (Diseases and remedies on Okra crop)
भुरी : भेंडीवर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 1 किलो किंवा डायथेनएम 45, 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
किड : भेंडी पिकास मावा तुडतुडे शेंडेअळी लाल कोळी या किडींचा प्रादूर्भाव होतो.
उपाय : या किडींच्या नियंत्रणासाठी 35 सीसी एन्डोसल्फान 1248 मिली किंवा सायफरमेथीरीन 35 सी सी 200 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. पहिली फवारणी उगवणीनंतर 15 दिवसांनी नंतरच्या फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने करावी.
मिरची वरील रोग व कीड व्यवस्थापन (Disease and pest management on chillies)
रोग
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50 टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळा भोवती ओतावे.
फूलकिडे : हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोप लावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा : हेक्टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हेही वाचा :
1)या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात…
2)केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!