ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Project | मोदी सरकारची मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी केले तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, तरुणांसाठी सुवर्णसंधी…

Project | आता सध्या महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यात दिली आहे. तसेच मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद देखील साधला. तसेच यावेळी मेळाव्यात तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप देखील करण्यात आले.

आता सध्या महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. तसेच या प्रकल्पांवर काम देखील सुरू आहे. तर काही प्रकल्प हे लवकरच सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्रात रेल्वेसाठी देखील 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात (Finance)आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी दिली आहे.

वाचा: मुख्यमंत्रीचा मोठा निर्णय: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश..! जाणून घ्या महत्वाचे निकष

आता सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून करण्यात 8 कोटी महिलांचे सक्षमीकरण

तर यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात 8 कोटी महिलां सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देखील देण्यात आली आहे. तसेच या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगारची हमी देत(Finance) देखील आहेत. यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहेत, असे देखिल त्यांनी सांगितले.

वाचा: नादचखुळा! राज्य सरकार थेट घालणार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला लगाम; ‘या’ पॅटर्नमध्ये करणार अमुलाग्र बदल

स्टार्ट अप उद्योगांना मिळणार पाठबळ

तर याशिवाय स्टार्ट अप, लघु उद्योगांना देखील पाळबळ देण्यासाठी सरकार आर्थिक(Finance) मदत करणार आहेत. तर त्यामुळे तरुणांना आपलं कौशल्या दाखवण्याची संधी मिळेल. तसेच सरकारच्या प्रयत्नांमधून दलित, आदिवासी, महिलांना देखील यातून समान संधी उपलब्ध होत आहे, असेही ते म्हणाले.
तसेच केंद्र सरकार या पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातूनच रोजगाराच्या लाखो संधी निर्माण(Finance) होतात. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी भविष्यात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Modi government has approved 225 projects worth 2 lakh crores for the people of Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button