आरोग्य

Health Tips | तुम्ही तर चुकीच्या पद्धतीने उपवास करत नाही ना? अन्यथा पोहचू शकते तुमच्या आरोग्यास हानी

Health Tips | आपल्याला माहीतच आहे की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा काहीही खात नाही तेव्हा आपल्या शरीरातून ऊर्जा नाहीशी होते. तसेच आयुर्वेदात उपवास करताना शरीराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला(Lifestyle) जातो.

तसेच उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते. परंतु अशावेळी शरीर कमकुवत होणार नाही याची देखील काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो. जेव्हा उपवासाच्या वेळी आहारात बदल होतो, तेव्हा झोप आणि आळशपणा जाणवणे सामान्य आहे. तसेच मानवी शरीर हे नैसर्गिकरित्या स्वतःची काळजी घेण्यास (Lifestyle)सक्षम असते. पण आयुर्वेदानुसार उपवासाचे योग्य पालन करणे देखील आवश्यक आहे.

वाचा: मुख्यमंत्रीचा मोठा निर्णय: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश..! जाणून घ्या महत्वाचे निकष

आयुर्वेदात सांगितले आहेत उपवासाचे हे फायदे

सध्या श्री तत्व पंचकर्म डॉट कॉम नुसार, आयुर्वेदात उपवास हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. तसेच उपवासामुळे लोकांची पचनक्रिया सुरळित राहते. त्याचसोबत शरीर मनही स्वच्छ आणि शांत(Lifestyle) राहते. तसेच शरीरातून विषारी घटक देखील काढून टाकले जातात. मेंदूची काम करण्याची क्षमता देखील वाढते. त्वचेची चमक वाढते आणि केसांसाठीही फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहते.

वाचा:हिवाळा लागताच ओठ फुटू लागलेत? तर फुटलेल्या ओठांसाठी संपूर्ण हिवाळ्यात करा ‘हे’ घरगुती उपाय

उपवास करताना या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

जेव्हा उपवासाच्या वेळी भूक लागते तेव्हा खा. तेव्हा लिंबू, आले, वेलची, पुदिना, बडीशेप यांसारख्या गोष्टींचे सेवन करावे. तसेच वेळोवेळी गरम पाणी प्या, त्यामुळे शरीरात हायड्रेशन टिकून (Lifestyle)राहते. उपवासाच्या शेवटी, आहारात फक्त ज्यूस किंवा हलके अन्न समाविष्ट करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : You also fast this wrong way; Then it can harm your health!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button