Weather News | शेतकऱ्यांनो राज्यात 3 दिवस ‘या’ 7 जिल्ह्यांना जोरदार गारपीटीचा धोका; तर तीन जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा
Weather News | राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे (Weather News) प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर इतर भागात काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील.
विदर्भात गारपीटीचा अलर्ट:
हवामान विभागाने आज विदर्भातील अकोला, वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगरर्जनेसह गारपीटीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.
इतर भागातील पावसाचा अंदाज:
विदर्भातील बुलडाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, जळगाव, पुणे, नगर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
उद्या आणि परवाचा अंदाज:
उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा तसेच नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. शुक्रवारी वाशीम आणि वर्धा जिल्ह्यात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. शनिवारी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज.
सावधानता:
- नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
- गारपीटीचा अंदाज असल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
- शेतीची पिके आणि वस्तू यांचे योग्य संरक्षण करावे.