प्रश्न तुमचे उत्तर आमचे !

प्रश्न तुमचे उत्तर आमचे: अमोल जनार्धन किन्नके यांनी, “शेतकरी गट स्थापना विषयक” विचारलेल्या प्रश्नांचे इतंभूत माहिती फक्त E शेतकरी वर…

Your answer to our question: Amol Janardhan Kinnake, "Farmers Group Establishment"

प्रश्न: नमस्कार सर मला १० ते १२ शेतकरी मिळून शेतकरी गट स्थापन करायचा आहे तरी मला संपूर्ण माहिती द्या. ( अमोल जनार्धन किन्नके )

उत्तर:
कोरोना या काळामध्ये सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला असून शेती क्षेत्रावर देखील त्याचा पडसाद उमटले आहे बरेच वेळा शेतातील माल मार्केट ची उपलब्धता नसल्याकारणाने शेतामध्ये सडून गेला, परंतु काही शेतकरी गट यांनी मिळून थेट ग्राहकापर्यंत शेतमाल पोचवला या काळामध्ये त्यांनी नफा देखील मिळवला. शेतकरी गटाचे अनेक फायदे असून प्रत्येक संकटात सर्व शेतकरी मिळून सामना करत असतात त्यातूनच एकीचे बळ मिळत असते.

शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ आणि पर्यायाने शेतकरी पासून कृषी उद्योग बनण्याकरता अनेक शेतकरी एकत्र येऊन एक संस्था निर्माण करतात म्हणजेच एक उत्पादक कंपनी निर्माण करतात. ही उत्पादक कंपनी उद्योग मंत्रालयांतर्गत कायदे २००२ -२०१३ नुसार केली जाते.

सहकारी संस्था तसेच खाजगी संस्था याचा योग्य मिलाफ म्हणजे शेतकरी गट होय. हा गट बनवण्याकरता कमीत कमी दहा किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांची वास्तविक शेती आहे किंवा दोनपेक्षा अधिक संस्था ज्या वास्तविक शेती उत्पादक कंपन्या आहेत. कायद्याच्या कलम 581 नुसार उत्पादक कंपनी स्थापन करू शकतो.

हेही वाचा:  सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…

कंपनी रजिस्टर यांचे कायद्याचे पालन ना बाबत समाधान झाली तरी अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसाच्या आत कंपनी स्थापन केल्याची पुर्तता झाल्याचा दाखला मिळतो म्हणजेच कंपनी स्थापन होतेही कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये निर्देशित केल्यानुसार त्यांनी गुंतवलेला शेअर कॅपिटल इतकीच मर्यादित राहते पेड किंवा कॅपिटल.

अशाप्रकारे स्थापन कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चा दर्जा प्राप्त होतो तसेच ही कंपनी कधीच पब्लिक लिमिटेड बनू शकत नाही किंवा त्याचे रूपांतर होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

हेही वाचा:  अबब ! “ऐकावे ते नवलच”, नाकात लिंबूचा रस घातल्यावर पाच मिनिटात कोरोना गायब होतो, जाणून

शेतकरी उत्पादक कंपनी यांचे उद्दिष्ट
१)कृषी विस्तार सेवांमध्ये सुधारणा करणे.

२)शेतकऱ्यांना संघटित करून अडचणींवर मात करणे शेतकरी गटातील सदस्यांना प्रशिक्षण देऊन क्षमता बांधणी.
३)विविध प्रकारचे तंत्रज्ञान माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे व त्यांची उत्पादकता वाढवणे.

४)दर्जेदार शेतमालाचे उत्पादन करणे व शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून त्याची गुणवत्ता वाढवणे व रोजगार निर्माण करणे.

५)यामधून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साध्य करणे.

हेही वाचा:  सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…

शेतकरी उत्पादक कंपनी मधील कामे
१)उत्पादन कंपनी खरेदी ग्राइंडिंग पुल्लिंग हाताळणी विपणन विक्री.

२)उत्पादनाची जतन वाळवण पॅकेजिंग क्लिनिंग प्रामुख्याने सदस्यांना यंत्रसामग्री उपकरणे के उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करणे.

३)परस्पर सह्याने तत्वाचे प्रशिक्षण प्रदान करणे तांत्रिक सेवा सल्लागार सेवा प्रशिक्षण संशोधन आणि विकास.

 हेही वाचा: आता होणार कोंबडी शीवाय पिल्ले तयार? काय आहे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी यंत्र; पहा सविस्त

शेतकरी उत्पादक कंपनी मधील उत्पादने या प्रकारे घेऊ शकतो;
१)फळे भाजीपाला मशरूम व इतर पिके
२)दूध दुग्धजन्य पदार्थ.
३)कोंबडी आणि इतर मास.
३)मासे व इतर समुद्र प्राणी.
४)कडधान्य तृणधान्य तेलबिया.
६)औषधी वनस्पती.

हेही वाचा: जमिनीचा नकाशा कसा बघायचा?

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फायदे
१)शेतकरी उत्पादक कंपनी ची नोंदणी झाल्यापासून पुढील पाच वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.

२)सरकारने शेतकरी उत्पादक कंपनीला प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी 2018 व 19 चे बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीन ला मंजुरी दिली आहे त्याकरता पाचशे कोटीची त्यांनी तरतूद केली आहे.

हेही वाचा: पीक काढण्याची सर्व कामे होतील ह्या एका मशिन ने पहा काय आहेत अजून या मशीनचे फायदे

३)शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळवून यांमध्ये सुलभता निर्माण होते.

४)नाबार्ड करून सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होते तसेच विविध प्रकल्पांना अनुदान दिले जाते.
समूह शेती तसेच समूह शेती लागणारे तंत्रज्ञान सरकारकडे सुलभतेने उपलब्ध करून दिले जाते.

५)अण्णासाहेब पाटील महामंडळ आखडून विनातारण बिनव्याजी दहा लाख रुपये कर्ज मंजूर केले जाते.

हेही वाचा: उसाच्या शेतीला द्या ह्या नव्या पद्धतीने पाणी वाचले वेळ व पैसा

शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

१)प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले पॅन आणि आधार कार्ड.

२)संचालक आणि सभासदाची याचे स्वतः प्रमाणित केलेले ओळखपत्र यामध्ये मतदार पत्र ड्रायव्हिंग लायसन व पासपोर्ट यांचा समावेश होतो

३)प्रत्येक संचालकांनी सभासदाचे रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो

४)प्रास्तविक कंपनी साठी योग्य नाव

हेही वाचा:  पीक काढण्याची सर्व कामे होतील ह्या एका मशिन ने पहा काय आहेत अजून या मशीनचे फायदे

४)कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयासाठी चालू वीज बिल आणि एनोसी

५)प्रत्येक संचालकांनी सभासदाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

६)प्रत्येक संचालकांचा आणि सभासदांची शैक्षणिक पात्रता.

७)प्रत्येक संचालकाच्या जन्म ठिकाण कंपनीचा प्रास्ताविक व्यवसायाबद्दल माहिती.

हेही वाचा:

चला तर जाणून घेऊ या सरकार चे काही महत्वाचे योजनांची माहिती सोप्या पद्धतीने आपल्या मी E-शेतकरी वेबसाईटवर…

१)या योजनेमध्ये खाते उघडा आणि मिळवा 1.3 लाख रुपयांचा फायदा! आणि मिळवा भरघोस फायदे…_
२(वृक्ष लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…_
३)या योजनेच्या सहाय्याने करा “फळबाग लागवड” मिळेल 100% केंद्र पुरस्कृत अनुदान.._
४)या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?_
५)पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button