ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

या योजनेच्या सहाय्याने करा “फळबाग लागवड” मिळेल 100% केंद्र पुरस्कृत अनुदान..

With the help of this scheme, "Horticulture Planting" will get 100% centrally sponsored grant.

शेतीमध्ये उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकरिता सरकार नवीन योजना नेहमीच राबवित असते. यातून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून उत्पादन करून आर्थिक परिस्थिती सुबत्ता वाढवण्याचा हा प्रमुख उद्देश आहे.

पारंपरिक शेती करताना त्यासोबत फळबाग लागवड केल्यास अधिक फायदा होतो . फळबाग लागवडीकरिता शासन सुद्धा प्रोत्साहन करत असते . त्याकरता महत्त्वाची एक योजना राबवली गेली या योजनेचे नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत(mahatma Gandhi national rural scheme) फळबाग लागवड कार्यक्रम.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाते. तसेच फळबाग लागवडीतून पूरक व्यवसायात वाढ करणे, आर्थिक उत्पन्न वाढवणे हे आहे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम सर्वत्र चालू आहे राज्यातील राज्यातील 34 जिल्ह्यात या योजनेचा लाभ मिळत आहे.

योजने अंतर्गत फळबाग लागवडीचे क्षेत्रात वाढ करणे तसे शेतावरील बांधावरील व पडीक जमीन असेल तर फळबाग करून त्याची लागवड करता येते.

या योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू , डाळिंब, संत्रा मोसंबी, लिंबू, नारळ , बोर , सीताफळ , आवळा, चिंच जांभूळ , कोकम, सुपारी गिरीपुष्प, सोनचाफा, कडुलिंब, शेवगा हजार बांबू, करंज इत्यादी फळ झाडे तसेच वनस्पती औषधे पुरवली जातात.

  • या योजनेची पात्रता*(eligibility of scheme)
    1) लाभार्थीच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.

2) कुळ कायदा जमीन येत असल्यास सातबाराच्या उताऱ्यावर कुळाचे नाव असले पाहिजे.

3)योजनेसाठी जॉब कार्डधारक व्यक्ती म्हणजेच होते हो प्रवर्गातील कोणती व्यक्ती या योजनेस लाभार्थी म्हणून पात्र आहे.

4) लाभार्थ्यांना दोन हेक्‍टर क्षेत्राची मर्यादित फळझाड लागवड करता येते.

5) योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती पिके 90 टक्के आणि कोरडवाहू पिके 75 टक्के जिवंत होतील अशाच लाभार्थींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.

हे ही वाचा.,.

  1. पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…
  2. ” मागेल त्याला शेततळे “योजनेची संपूर्ण माहिती, अटी, तसेच कसा कराल अर्ज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button