हापुस आंबा ओळखण्यासाठी कोकणातील बागायतदारांनी केला हा मॉडर्न उपाय..
This is a modern solution developed by Konkan growers to identify Hapus Mango.
रत्नागिरी हापूस म्हणल्यावर अनेकांच्या जिभेवर चव रेंगाळते असते. परंतु बऱ्याच वेळा हापूस मध्ये भेसळ केली जाते. बऱ्याच जणांना हापूस आंबा ओळखताही येत नाही, आणि ग्राहक सुद्धा फसला जातो. परंतु कोकण मधील काही बागायतदार शेतकऱ्यांनी यावर जालीम उपाय काढला आहे. त्यांनी हापूसला क्यू आर कोड लावला असून ग्राहकांना ओरिजनल हापूस मिळण्याकरिता त्यांनी हा नवीन फंडा काढला आहे. त्यामुळे यावर्षी ओरिजनल हापूस मिळू शकतो.
रत्नागिरी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांच्या संकल्पनेतून ही कल्पना बाहेर आले आहे व थेट आता आंब्याला क्युअर स्टिकर असल्याने लवकरच ओरिजनल हापूस ग्राहकांसाठी मिळेल.
कोकण मधील आंब्याला दोन वर्षापूर्वी हापूस नावाने जी आय त्या प्राप्त झाला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे या पास जिल्ह्यातील आंब्यांना हापूस म्हणता येणार आहे तसेच अन्य ठिकाणच्या आंब्याला हापूस म्हणता येणार नाही.
परंतु परराज्यातून येणाऱ्या आंब्याला हापुस च नावाने विक्री केली जात असल्यामुळे हापूस मध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत होती हि भेसळ रोखण्याकरिता हा क्यू आर कोड लावण्यात आला आहे. ए क्यू आर कोड स्कॅन केल्यास हा आंबा कोणता प्रकारचा आहे?कोणाच्या बागेतील आहे? त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती या कोड द्वारे समजणार आहे.
आता शेतकऱ्यांनी देखील आधुनिकतेची कास धरत हायटेक होण्याच्या मार्गावर आहेत गेल्या वर्षी पुरवण्याच्या काळामध्ये आंबा विक्री थेट ग्राहकापर्यंत पोचवण्याचे काम येथील शेतकऱ्यांनी केली होती मात्र यावर्षी हटके प्रयोग करत ग्राहकांना ओरिजनल हाऊस कसा मिळवून देता येईल याकडे यांचे लक्ष आहे याचा निश्चितच ग्राहक व शेतकरी यांना फायदा होईल.
हे ही वाचा:
१)कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!
२)महाराष्ट्राला हादरा : नाशिक मध्ये ऑक्सीजनची गळती मृतांची संख्या 22 वर, तर अजून मृतांची संख्या वाढण्याची भीती, कशी झाली ऑक्सिजनची गळती?