ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Wheat | असं काय झालं की तुर्कीने थेट भारताचा गहू नाकारला? जाणून घ्या कारण…

तुर्कीने भारताच्या गहूमध्ये रुबेला व्हायरसची शक्यता असल्याकारणाने भारताचा गहू नाकारला आहे. २९ मेपासून ५६,८७७ टन भारतीय गहू (Wheat) भरलेली जहाजे (Ship) तुर्कीतून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत.

Wheat | रशिया युक्रेनच्या हल्ल्यामुळे (Russia Ukraine attack) जागतिक स्तरावर गव्हाचा पुरवठा (Global wheat supply) विस्कळीत झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे सर्वात मोठे उत्पादक (Wheat Producers) आहेत. अनेक देशांना गहू टंचाईचा (Wheat Scarcity) सामना करावा लागत आहे. त्यामुळे बरेचसे देश जिथून भेटेल तिथून गहू आपल्या देशात आणत आहेत. अशी परिस्थिती असूनही तुर्कीने (Turkey) मात्र, भारताकडून मिळालेली गव्हाची खेप (Indian Wheat Consignment) परत केली आहे.

Reason for returning of Wheat Consignment | तुर्की ने गहू का नाकारला?
गव्हात रुबेला विषाणू (rubella virus) आढळल्याचे तुर्कीने म्हटले आहे. फायटोसॅनिटरीची चिंता व्यक्त करत तुर्कीने भारताचा गहू परत पाठवला आहे. भारतातून आलेल्या गव्हामध्ये (Wheat) रुबेला विषाणू आढळून आला होता. त्यामुळे तुर्कीच्या कृषी आणि वन मंत्रालयाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिली नाही.

वाचा: Yojana | काय सांगता? राज्य सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय पशुपालनसाठी अर्थसहाय्य, जाणून घ्या कागदपत्रे

वाचा: Business Trend | काय सांगता? सोलापुरातील एका गोवरीची किंमत १० रुपये, सुरू करा ‘असा’ व्यवसाय

Consequences | या सर्वाचा होनारा परिणाम…
रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कीने (Turkey) भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात. गव्हाचे संकट असताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गहू खरेदीसाठी पर्याय शोधले जात असताना तुर्कीने हा निर्णय घेतला आहे. भारतातील गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी आल्याने सुमारे 18 लाख टन धान्य विविध बंदरांवर अडकलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button