Yojana | काय सांगता? राज्य सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय पशुपालनसाठी अर्थसहाय्य, जाणून घ्या कागदपत्रे
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशूपालन व्यवसाय करत असतो. मात्र, पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry Business) हा सहजरीत्या होत नसून हा व्यवसाय (Business) करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात.
Yojana | सध्याच्या महागाईच्या काळात जनावरांच्या (Animal price) किंमतीमध्ये मोठी वाढ निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पशुपालन व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे (Department of Animal Husbandry & Dairying scheme) योजना राबविण्यात येणार आहेत.
योजना
पशुसंवर्धन विभाग योजनेअंतर्गत गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पालन इत्यादींसाठी अनुदान मिळणार आहे. संबंधित योजना ही शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्टीनेही तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या योजनेअंतर्गत संकरित गाय- एच. एफ., जर्सी म्हैस, मुन्हा, जाफराबादी, देशी गाय-गीर, साहिवाल, थारपारकर देवनी, लाल कंधारी, रेड सिंधी, राठी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशुपालनासाठी अनुदान मिळणार आहे. तसेच, शेळी-मेंढी गट वाटप योजनेअंतर्गत 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या व 1 बोकड किंवा नर मेंढा दिला जाणार आहे.
वाचा: Business Trend | काय सांगता? सोलापुरातील एका गोवरीची किंमत १० रुपये, सुरू करा ‘असा’ व्यवसाय
पात्रता
या योजनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक, सुशिक्षित बेरोजगार, अत्यल्प, अल्प भूधारक आणि सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गट इत्यादींना पशुपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य म्हणून अनुदान दिले जाते. व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे. 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प किंवा अल्प भूधारक शेतकरी आणि ३० टक्के महिला व ३ टक्के अपंगांना प्राधान्य. इत्यादी सर्व व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
वाचा: ससेपालन करून कमी जागेमध्ये मिळवू शकता अधिक उत्पादन; पहा ससेपालन व्यवसाय सविस्तर..
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जासोबत आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- 7/12 व 8-अ उतारे
- शिधापत्रिकेची सत्यप्रत
- सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांक
- राष्ट्रीयकृत बँकेत खाते
- अर्जदाराचे फोटो
- अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत
- दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास दाखला जोडणे आवश्यक आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: