ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

हळद, सोयाबीन व तुरीची बाजारपेठत आवक सुरू, पहा या पिकांना आज मिळालेले दर..

सध्या सरासरीप्रमाणे सर्वच शेतीमालाचा दर असला तरी मालाच्या दर्जानुसार भाव मिळत असल्याचे चित्र हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक हळदीचे क्षेत्र हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. शिवाय जिल्ह्यातील वसमत ही मोठी बाजारपेठ असून येथील चोख व्यवहारामुळे सध्या हळदीची आवक सुरु झाली आहे.

वाचा: आर्थिक घोटाळा झाला तर पुढच्या ७२ तासांत बँक पैसे करते परत ; फक्त या गोष्टी करण्याची असते आवश्यकता …

तसेच सोयाबीनला अधिकचा दर मिळेल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. आता अंतिम टप्यात शेतकरी सोयाबीनचीही विक्री करीत आहे शिवाय तुरीचीही आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या हळद, तूर आणि सोयाबीनची आवक सुरु आहे.

वाचा: “या” जातीची गाय देते तब्बल 50 ते 55 लिटर दूध, “या” ठिकाणी आढळते ही गाय..

मुख्य पिकांचे दर –

गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. असे असले तरी आवक मात्र, वाढलेली आहे. तुरीची आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून दिला असताना आता खुल्या बाजारपेठेत 6 हजार 200 प्रमाणे सरासरी दर मिळत आहे.

केंद्रावर तूर विक्री करताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पैशासाठी 15 दिवसांची वेटींग यामुळे शेतकरी थेट व्यापाऱ्याकडे विक्री करीत आहे. तसेच तुरीचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हळदीची काढणी कामे सुरु आहेत. हंगामाच्या सुरवातीला हळदीला 8 हजार 500 रुपये दर मिळत आहे. हा दर सरासरी एवढा असून भविष्यात यामध्ये वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button