ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tractor Subsidy | कर्जावर नाहीतर शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत मिळणार ट्रॅक्टर! राज्य शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींना मंजूरी

Tractor Subsidy | पिक लावायचं म्हटलं शेतीची मशागत करावी लागते. मशागतीशिवाय पेरणी करणे शक्य नसते. कारण ज्यावेळी शेतीची योग्य पद्धतीने मशागत होते, त्यानंतरच शेतकरी शेतीमध्ये पिकाची लागवड करू शकतात. मशागतीसाठी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरचा (Tractor Subsidy) वापर केला जातो. परंतु ट्रॅक्टरच्या किमती लाखांमध्ये असतात त्यामुळे शेतकरी (Agriculture) ट्रॅक्टरची खरेदी करू शकत नाहीत. म्हणूनच राज्यात ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’ राबवली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान (Tractor Subsidy) दिले जाते. संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

राज्य शासनाचा मोठा निर्णय
ट्रॅक्टर साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तब्बल 50 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ निम्म्याच किमतीमध्ये ट्रॅक्टर (Tractor Subsidy) मिळतो. शेतकरी या योजनेचा आधार घेऊन शेतीच्या (Agriculture) मशागतीसाठी स्वतःच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. आता राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानास (Tractor Subsidy) मंजुरी देण्यात आली आहे.

‘इतक्या’ लाखांना मंजुरी
2023 आणि 24 या वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 210 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता यासाठी तब्बल 30 कोटी रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 31 मे रोजी घेण्यात आला आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कृषी यंत्रांसाठी आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. शेतकरी कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घेऊन निम्म्या किमती ट्रॅक्टरची खरेदी करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will get tractors on loan or at half price! The state government has sanctioned almost crores

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button