ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Today’s Weather Update | बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायमच; जाणून घ्या कोण कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस?

Today’s Weather Update | राज्यात सध्या उन्हाळा ऋतू संपला असून मान्सून सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे राज्यात मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, राज्यात मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न पडला आहे. अशातच, आता कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Today’s Weather Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण राज्यातही चांगला पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कुठे होणार मुसळधार पाऊस?

आज कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कोकण इत्यादी जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागातील धबधबे आता सक्रिय होऊन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

राज्यातील काही भागांत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज
उत्तर प्रदेशच्या वायव्य भागामध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामानातील बदलांमुळे उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

यलो अलर्ट जारी

दरम्यान, हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सध्या कोकण घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Farmers, there will be heavy rains in the state, orange alert has been issued for these districts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button