Crop Insurance | शेतकऱ्यांनो पंतप्रधान पिक विमा योजनेच्या लाभासाठी ‘या’ तारखेपर्यंत व्हा सहभागी; अन्यथा होईल मोठं नुकसान, त्वरीत जाणून घ्या
Crop Insurance | भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासनामार्फत राबवल्या जातात. शेतकऱ्यांना शेती करताना अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या नुकसानीस आर्थिक मदत म्हणून देशामध्ये शासनामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना (Crop Insurance) राबवली जात आहे. संबंधित योजना ही खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात राबवली जात आहे. यासाठी अंतिम तारीख देण्यात आली आहे.
वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …
‘या’ तारखेपर्यंत व्हा सहभागी
पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये सोयाबीन, मूग, तूर, उडीद, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांचा समावेश होतो. अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित पिक योजनेच्या अंतिम मुदतीपूर्वी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनी शेतीची होणाऱ्या नुकसान भरपाई 110 टक्क्यांपर्यंत देणार असून उर्वरित नुकसान भरपाई ही राज्य शासन शेतकऱ्यांना देणार आहे. संबंधित पिक विमा योजनेत रजिस्टर करण्याची 31 जुलै ही अंतिम तारीख आहे
वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
एका रुपयांत मिळणार पिक विमा
पंतप्रधान पिक विमा योजना 2023-24 या चालू वर्षामध्ये बीड पॅटर्न (80:110) आधारित राबवण्यात येत आहे. तसेच, शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी केवळ एक रुपयात ही पिक विमा मिळणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या विमा कंपनी मार्फत ही पिक विमा योजना राबवली जाणार आहे. तसेच, अकोला जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इर्गो कंपनी या पिक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा दीला जाणार आहे.
Web Title: Join till ‘this’ date for benefits of Pradhan Mantri Pik Bima Yojana; Know in detail
हेही वाचा:
- पिकांना विद्राव्य खत देताय ? मग ही काळजी घ्याचं ; अन्यथा होऊ शकते नुकसान
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..