ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Agriculture Loan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक कर्जाची फक्त मुद्दलचं व्याज होणार माफ, लगेच वाचा गोड बातमी

Agriculture Loan | सहकार आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (मुंबई वगळून) महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. ज्यानुसार, हंगाम 2023-24 मधील पीक कर्जाची (Crop Loan) दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांकडून फक्त कर्ज (Agriculture Loan) मुद्दल रक्कम वसूल करावी आणि व्याजवसुली करू नये.

काय दिल्या सूचना?
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार मुद्दल रक्कम वसूल करा. व्याज माफ करून शेतकर्‍यांना दिलासा द्या. अशा शेतकर्‍यांना पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरवा. जिल्हा बँकांनी नियम पालन करावे.

  • सहकार आयुक्तालयाची सूचना:
  • श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक (पतसंस्था) यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे ही सूचना दिली आहे.
  • शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ मिळेल.
  • बँकांनी शासनाकडून व्याज रक्कम मिळवून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

वाचा| Irrigation Wells | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सिंचन विहिरींसाठी 100 टक्के अनुदानासाठी मंजुरी, जाणून घ्या सविस्तर

  • पीडीसीसी बँकेचे निर्देश:
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी सहकार विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकर्‍यांची फक्त मुद्दल रक्कम वसूल करावी.
  • अशा शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ द्यावा.
  • पुढील पीक कर्जासाठी त्यांना पात्र ठरवावे.
  • शेतकऱ्यांसाठी फायदे:
  • यामुळे शेतकर्‍यांवर बोजा कमी होईल.
  • कर्ज आणि व्याज एकाच वेळी भरण्याची गरज नाही.
  • शेतकऱ्यांना पुढील पीक कर्जासाठी मदत होईल.

Web Title | Agriculture Loan | Good news for farmers! Only principal interest of crop loan will be waived, read the good news immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button