ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Crop loan | ‘या’ जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 31 मार्चपर्यंत कर्ज भरा आणि मिळवा व्याज माफी!

Crop loan 'This' district bank is a big relief for farmers! Pay the loan till March 31st and get interest waiver!

Crop loan | अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. (Crop loan) या निर्णयामुळे जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, “राज्य सरकार दरवर्षी पीक कर्जावरील व्याजाची 6 टक्के रक्कम बँकेत जमा करते. यावर्षी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम व्याजासह बँकेत जमा करावी लागत होती.”

“आता बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, 31 मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज (Crop loan) माफीचा लाभ मिळेल. सरकारकडून व्याजाची रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ती रक्कम बँकेत जमा करावी किंवा नवीन पीक कर्ज घेताना ती रक्कम भरावी,” असे कडू यांनी स्पष्ट केले.

वाचा | Agriculture Scheme | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटींचा फळबाग अनुदान निधी येणार

राज्यात व्याज माफीचा लाभ देणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली बँक असल्याचा दावा कडू यांनी केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर असलेला आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत आपले कर्ज भरणे गरजेचे आहे.

Web Title | Crop loan ‘This’ district bank is a big relief for farmers! Pay the loan till March 31st and get interest waiver!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button