ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Weather Forecast | … और कितनी तारीख पे तारीख? मान्सून शेतकऱ्यांना देतोय चकवा, जाणून घ्या नेमका कधी बरसणार…

Weather Forecast | सध्या हवामानाचे चक्र बदलताना दिसून येत आहे. खुद्द हवामान विभागाला देखील हे चक्र चकवा देत आहे. सुरुवातीला भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता पावसाळा सुरू होऊन देखील अद्यापही कुठेही पावसाचा पत्ता लागत नाहीये. आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात करायची आहे. परंतु शेतकऱ्यांना चकवा देणारा हा पाऊस राज्यामध्ये कधी दाखल होईल? हे जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांसमोर पावसाचं संकट उभा
गेल्या काही दिवसांपासून बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनची बाबतची चिंता वाढवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे खूप मोठं संकट उभा राहिले आहे. शेतकरी पाऊस पडताच खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात करतात. परंतु अशातच ऐन पावसाळ्यात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विदर्भासह तिथं छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, तेलंगणा येथेही काही भागांमध्येही उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कधी पडणार पाऊस?
तर शेतकरी मित्रांनो आता हवामान विभागाने पावसाबाबत नवा अंदाज वर्तवला आहे. आता मान्सून 24 जून रोजी पुण्यात हजेरी लावणार आहे. तर 25 जूनला पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, 26 जूनपासून पुण्यात पावसाचा जोर वाढेल वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

Web Title: aur kinti tarihi pe tarihi? Monsoon is giving a warning to the farmers, know exactly when it will rain…

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button