ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 2000 हजार रुपये…

The wait is over! 2000 thousand will be credited to the farmers' account on this date.

पंतप्रधान किसान सन्मान निधी(Prime Minister’s Farmers Honors Fund) योजनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 ऑगस्ट पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

प्रधानमंत्री पंतप्रधान किसान सन्मान निधी बद्दल थोडक्यात माहिती :

PM शेतकरी सन्मान निधी योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना आहे, या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा तसेच बियाणे, (Seeds) खते (Fertilizers) खरेदी करण्यासाठी ही रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. 2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट (Account) वर जमा केले जातात. परंतु या वर्षी या योजनेत बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार आणि कोणाला वगळणार, हे स्पष्ट केले आहे. याचा उद्धेश फक्त्त गरीब शेतकरी बांधवाना लाभ मिळणे होय.

अशी नोंदणी करा मिळेल 4000 रुपयांचा लाभ…

पंतप्रधान किसान सन्मान योजनेला तीस महिने पूर्ण झाले असून, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काढलेली सर्वात यशस्वी योजना म्हणून पाहिले जाते. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन (Offline) आणि ऑनलाईन (Online) पद्धतीने नोंदणी करता येते, अजूनही काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी निश्चितपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.pmkisan.gov.in या वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती व्यवस्थित भरा लाभार्थी व्हा.

आपल्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम आली आहे की नाही कसे तपासावे…

• पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) या वेबसाईटच्या लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.

• उघडलेल्या पृष्ठामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून आपण स्थिती जाणून घेऊ शकता.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, ‘इफकोचा नॅनो युरिया’

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! ‘बाजार समितीच्या’ माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, 1 लाख कोटी रुपये वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button