नाशिक : ‘आशिया’ खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून लासलगावचीबाजार समितीची ओळख आहे. लासलगाव कृषी बाजार समितीमध्ये (In Lasalgaon Agricultural Market Committee) टोमॅटोचे लिलाव पार पडले या लिलावामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. व्यापारी तसेच शेतकऱ्यांनी या लिलावामध्ये उदंड प्रतिसाद दिला लासलगाव कृषी बाजार समिती कांद्यासाठी (For onions) प्रसिद्ध असली तरीही टोमॅटोचे (Of tomatoes) ही लिलाव गेल्या काही वर्षापासून पार पाडले जात आहेत.
टोमॅटो लिलाव (Tomato Auction) शुभप्रसंगी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी 1790 क्रेट्समधून टोमॅटो लिलावासाठी आणला होता. 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्सला कमाल 601, किमान 151 तर सर्वसाधारण 431 रुपये इतका बाजार भाव मिळाला. देशातील इतर राज्यांमध्ये टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बहुतांश राज्य महाराष्ट्रातील टोमॅटोवर अवलंबून आहे, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी देखील चांदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या (Of Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील बऱ्याच ठिकाणच्या बाजार समित्या बंद होत्या मात्र पुन्हा एकदा ह् बाजार समिती सुरू झाल्याने सुरु तोबा गर्दी उसळली आहे. लासलगाव बाजार समितीच्या या टोमॅटो लिलावाच्या माध्यमातून होणार गर्दीमुळेही प्रशासनला देखील व्यापारी व शेतकऱ्यांनी मदत करणे तितकेच गरजेचे ठरेल.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये टोमॅटोचे काय दर आहे हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा :
हे ही वाचा :