ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पीक व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचनाचे ‘ हे ‘ आहेत फायदे…

The benefits of drip irrigation in crop management are ...

“जल हे तो जीवन है” असे म्हणाले जाते, काही पुस्तकांमध्ये पाण्याला “अमृताची ” देखिल उपमा दिली आहे. त्यामुळे पाणी बचत करणे हे अत्यावश्यक आहे मग पिण्याचे पाणी असो किंवा शेतीसाठी

शेती करताना शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन देखील करावे लागते, कमी पाण्यामध्ये अधिक जोमाने पीक कसे करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते. शेतकरी पाणीबचत होण्यासाठी तसेच पीक अधिक जोमाने येण्यासाठी विविध उपाय राबवत असतो.

पिकांच्या व्यवस्थापनामधील महत्त्वाचा घटक म्हणजे ठिबक सिंचन . ठिबक सिंचना मध्ये फक्त पाण्याची बचत होत नाही तर जमिनीची सुपीकता देखील वाढण्यास मदत होते. ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे कमीत कमी तीस ते पस्तीस टक्के पर्यंत आपण पाणी बचत करू शकतो.

ठिबक सिंचनाचे पीक व्यवस्थापनामध्ये किती फायदे आहे जाणून घ्या..

📌बऱ्याच पिकांना आवश्यकते प्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. शक्यतो उसाच्या पिकास ठिबक सिंचन पद्धती फार फायदेशीर ठरते त्यामुळे 50 ते 55 टक्के पाण्याची बचत होते.

📌 ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यामध्ये क्षेत्र सिंचित करणे शक्य होते. पिकांच्या मुळाशी पाणी गेल्यामुळे ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पीक वाढीस उपयुक्त ठरते व पिके जोमाने वाढतात

📌पाण्यात विरघळणार्‍या खतांचा, फॉस्फरिक आम्लाचा वापर ठिबक सिंचनाद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्रात केल्याने 30 ते 40 टक्के पर्यंत खतामध्ये बचत होते.

📌 ठिबक सिंचनामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकून राहून उत्पादनात वाढ होते

📌उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उत्सर्जन होते हे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘केओलिन ‘या बाष्पीभवन विरोधी द्रावणाचा 3 ते 4 दिवसाच्या अंतराने दोन तीन वेळा फवारण्या कराव्यात.

📌 ठिबक सिंचनामुळे,जमीन सपाटीकरण याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे बांधणीचा खर्च देखील वाचतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button