आता फक्त चेहऱ्याने डाउनलोड होणार तुमचा आधार कार्ड ( Aadhar card ) जाणून कसे?? काय आहे UIDAI चे एक नवीन फीचर…
How to know your Aadhar card will be downloaded only by face now ?? What is a new feature of UIDAI
आधारकार्ड ( Aadhar card) सर्व कागदपत्रांमधील महत्त्वाचा डॉक्युमेंट मानला गेला आहे कोणत्याही योजनेचा लाभार्थी होण्यासाठी, किंवा कर्ज काढण्यासाठी तसेच कोणतेही खाजगी, सरकारी काम करण्यासाठी आधारकार्ड ( Aadhar card) महत्वाचे मानले गेले आहे.
आधार कार्ड मध्ये नुकतेच एक नवीन फिचर ॲड करण्यात आले आहे ‘फेस ऑथेंटिकेशन’ (Face Authentication) असं या नवीन आधार कार्ड फीचरचं नाव आहे. या फिचरमुळे आधार कार्ड होल्डर्स ला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही या फीचर मदतीने तुम्ही घरी लॅपटॉप वर बसून आधारकार्ड डाउनलोड करु शकता. म्हणजेच आपण चेहऱ्यांच्या मदतीने आधारकार्ड डाऊनलोड करू शकतो तसेच या फिचर मुळे विना ओटीपी काम होऊ शकते.
यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल.
तुम्ही यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जावे
- होमपेजवर गेल्यावर तुम्हाला आधार कार्ड काढा (Get Aadhaar Card )हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- ‘फेस ऑथेंटिकेशन ‘ (Face Authentication) करण्यासाठी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल
- त्यानंतर तुम्हांला ‘फेस ऑथेंटिकेशन (face authentication) हा पर्याय दिसेल.
- ऑथेंटिकेशन प्रक्रिया करत असताना चेहरा वेरिफाय करावा लागेल.
- यानंतर ओकेवर (OK) क्लिक करा, हे करताच कॅमेरा सुरू होईल. आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशा प्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल.
- कॅमेरा आपला फोटो घेईल आणि ही प्रक्रिया येथेच संपल्यानंतर, त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. ही माहिती एका वृत्तपत्रामध्ये सांगण्यात आले आहे