Students | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीच अडचण निर्माण होऊ नये. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना (Student) लहान वयात वह्या आणि पुस्तकांचे ओझे शाळेत न्यावे लागते, हा मुद्दा अनेक काळ चर्चेत राहिला आहे. यावर सातत्याने विचार करण्यात देखील आला आहे. शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून हे ओझे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. आता विद्यार्थ्यांच्या (Student Facilities) हितासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा: पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! 13व्या हप्त्यासाठी ‘ही’ कागदपत्रे देणे बंधनकारक, नाहीतर रहाल वंचित
विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकांसोबत वह्याही मोफत
इथून मागे विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत देण्यात येत होती. जेणेकरून पालकांवरचा शैक्षणिक बोजा कमी होईल. तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक (Financial) कारणामुळे शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होऊ नये हाच यामागील उद्देश आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत (Finance) मिळणार आहेत. त्यामुळे आता पालकांवरील वह्यांचा खर्च देखील कमी होणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर (Deepak Keskar) यांनी दिली आहे.
दप्तरातील ओझेही होणार कमी
शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांच्या दप्तरातील (Insurance) ओझे देखील कमी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल वह्या मोफत दिल्याने दप्तरातील ओझे कमी कसे होणार? पण शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तरातील (Insurance) ओझे कमी करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आहे. आता थेट पुस्तकातच प्रत्येक पानापाठोपाठ एक कोर पान देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्यांचा खर्चही टळेल आणि दप्तरातील ओझं देखील कमी होईल.
शिक्षणाची वाढेल गोडी
सध्या पुस्तकामध्ये कोरी पान कशी देता येतील त्यावर विद्यार्थी कशाप्रकारे नोट्स काढू शकतील यावर विचार सुरू आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा गोरगरिबांतील विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे गरिबांच्या विद्यार्थ्यांमध्ये असणारे शिक्षणाची ही गोडी कायम ठेवण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- देशातील ‘या’ राज्यांत होणार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस! शाळांनाही सुट्टी जाहीर; हवामान विभागाचा इशारा
- कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?
Web Title: Big decision of the education department! Students will get books along with books for free and the burden of notebooks will also be reduced