पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! 13व्या हप्त्यासाठी ‘ही' - मी E-शेतकरी
PM KISANयोजना

PM Kisan | पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! 13व्या हप्त्यासाठी ‘ही’ कागदपत्रे देणे बंधनकारक, नाहीतर रहाल वंचित

PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे. आता सरकार पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. सध्या 13 वा हप्ता देण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट दिला आहे. जर शेतकऱ्यांनी या नवीन नियमांचे पालन केले नाही तर 13व्या (PM Kisan) हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग होणार नाहीत.

2 कोटी शेतकऱ्यांना मिळाले नाही पैसे
देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे (Financial) मिळाले आहेत. त्याचबरोबर 2 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमच्या 13 व्या हप्त्याचे पैसे (Financial) अडकू नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही हा महत्त्वाचा नियम पाळला पाहिजे.

वाचा: बिग ब्रेकिंग! आता ‘या’ प्रवर्गातील नागरिकांना मिळणार 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयाकडून 103 वी घटनादुरुस्ती वैध

रेशनकार्डची सॉफ्ट कॉपी द्यावी लागेल
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी रेशनकार्डची सॉफ्ट कॉपी देणे आवश्यक असल्याचे सरकारने सांगितले आहे. यासोबतच eKYCही आवश्यक आहे. त्याशिवाय तेराव्या हप्त्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.

पूर्वी ‘ही’ कागदपत्रे जमा करावी लागत होती
आतापर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी (Insurance) करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया संपली असून फक्त सॉफ्ट कॉपी जमा करायची आहे. आता या नियमामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून पारदर्शकताही वाढणार आहे. अनेक शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे (Insurance) अद्याप मिळालेले नाहीत.

वाचा: कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?

तुम्ही हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकता
PM किसानचा हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधला जाऊ शकतो. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर मेल करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news regarding PM Kisan Yojana! Now for the 13th installment it is mandatory to give these documents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button