ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Electricity connection | वीज कनेक्शन साठी उशीर होतोय ? तर ‘हा’ पर्याय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो फायदेशीर …

Electricity connection |शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पाण्याची गरज असते. यासाठी विजेची (Electricity) गरज असते. दरम्यान वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना’महावितरण’च्या ॲपवरील ए-वन फॉर्म ( A 1 Form) भरावा लागतो. तसेच त्यावर आपली स्वत:ची माहिती व सातबारा उतारा अपलोड करावा लागतो. याशिवाय या फॉर्मवर बोअर किंवा विहिरीची नोंद असावी लागते.

यानंतर कनेक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही पैसे भरावे लागतात. यासाठी तीन ते चार हजारांचा खर्च आणि सेक्युरिटी डिपॉझिट प्रत्येक ‘एचपी’ला एक हजार रुपये भरल्यास तीन दिवसांत विद्युत जोडणी दिली जाते. मात्र, यासाठी वीजेचा खांब आणि कनेक्शनमधील अंतर ३० मीटरपर्यंत असणे आवश्यक आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

‘महावितरण’ने सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २१ हजार शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन देण्याचे नियोजन केले आहे. तर, दुसरीकडे जून २०२१ नंतर अर्ज केलेल्या आठ हजार ७५ शेतकऱ्यांना अजूनही वीज कनेक्शन मिळालेले नाही. या शेतकऱ्यांचे कनेक्शन व जवळील डीपीमधील अंतर २०० ते ६०० मीटरपर्यंत अंतर आहे.

या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी तेथे त्यांना डीपी (ट्रान्स्फॉर्मर) बसवावा लागणार आहे. मात्र यासाठी शासनाकडून निधी मिळणे अपेक्षित आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने जून २०२१ पर्यंतच्या अर्जदार शेतकऱ्यांना ‘महावितरण’ने कनेक्शन दिलेले आहे. मात्र त्यापुढील उर्वरित निधी अजूनही प्राप्त झाला नाही. हा निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्याने उर्वरित शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना वेळेत वीज न मिळाल्याने ते वीज चोरीचा पर्याय अवलंबिवतात. अशावेळी वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण कडून वेळेत कनेक्शन देणे, हा पर्याय रास्त मानला जातो. दरम्यान, या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन किंवा संबंधित कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन देखील अर्ज करण्याची मुभा महावितरण कडून देण्यात आलेली आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

शेतकऱ्यासाठी हा पर्याय फायदेशीर

जर शेतकऱ्यांना महावितरण कडून वेळेत वीज कनेक्शन उपलब्ध होत नसेल तर त्यांच्यासाठी सोलार पंपचा ( Solar Pump) पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो. तीन ‘एचपी’ कनेक्शनच्या सोलर पंपासाठी जवळपास साडेतेरा हजार रुपये तर पाच ‘एचपी’चा पंप २७ ते २८ हजार रुपयांचा खर्च येतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठीची केवळ दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. उर्वरित ९० टक्के अनुदान ‘महावितरण’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते.

Solar pump is another option for electricity connection in farm

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button