ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Monsoon | यंदा महाराष्ट्रात वेळेत मान्सून दाखल होणार ! हवामान तज्ज्ञांनी सांगितला अंदाज ; ‘या’ तारखेला होणार आगमन…

पाऊस ( Rain) हा शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. उन्हाळा संपताच राज्यातील शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. मागच्या वर्षी काही ठिकाणी पाऊसाने पाठ फिरवली तर काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पडला. दरम्यान यंदा पाऊसाची स्थिती कशी असणार ? महाराष्ट्रात मान्सून (Mansoon) केव्हा दाखल होणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदाचे मान्सून चित्र आशादायी असणार

बऱ्याचदा राज्यात हवामानामुळे मान्सून उशिराने दाखल होतो. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. मात्र, हवामान तज्ज्ञांनी यंदाचे मान्सून चित्र आशादायी असणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील सर्व भागात मान्सून वेळेवर हजर होणार असल्याने यंदाचा मान्सूनचा काळ हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे असे हवामान तज्ज्ञ म्हणाले आहेत.

राज्यात वेळेत मान्सून दाखल होणार

हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी नुकताच यंदाच्या मान्सूनविषयीचा अंदाज सांगितला आहे. यावर्षी २० ते २२ मे किंवा त्या आधी मान्सून अंदमान निकोबार येथे दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येण्याचा रस्ता मोकळा असणार आहे. यामुळे राज्यात वेळेत मान्सून दाखल होणार आहे.

शेतकऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू

आता काही दिवसांतच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरणीसाठी अगदी जय्यत तयारी सुरु केली आहे. किमान यंदा तरी मान्सून वेळेत येईल व शेतकऱ्यांना फायदा होईल असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

Mansoon updates in maharashtra

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button