कृषी बातम्या

Seed Subsidy | अरे वाह! शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजकडून मिळणारं ‘हे’ बियाणे अनुदानित दरात…

हरभरा बियाणे अनुदानित दरात –

शेतकऱ्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणे ( Seeds ) अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य व तृणधान्य पिकांच्या ( Agriculture ) नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा. तसेच शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे ( Subsidy) यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission) व ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे (Mahabeej Chana Seed) अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले.

वाचाभावांनो प्रॉपर्टी बळकवल्यास घाबरता कशाला? ‘या’ कायद्याची मदत घेऊन मिळवा ना मालकी हक्क.

४२८ क्विंटल बियाणे वितरित करणार –

रब्बी हंगामाची सुरुवात झालेली असून खरीप हंगामाची सोयाबीन व भात कापणी व मळणीच्या मागे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना चांगले बीज मिळून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी या योजनेअंतर्गत जिल्ह्याला ४२८ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे.या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवानावाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत हरभरा (दहा वर्षांआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा (दहा वर्षांआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो व दहा वर्षांवरील वाण ५२ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत…

या योजनेअंतर्गत हरभऱ्याच्या जाती –

या योजनेखाली सरकार हे वाण उपलब्ध करून देणार आहे. फुले विक्रम, राजविजय -२०२, एकेजी-११०९, बी जी एम-१०२१६ व दहा वर्षांवरील विजय, दिग्विजय, विशाल व जॅकी-९२२८ , अशा चांगल्या उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती उपलब्ध होणार आहेत. दहा वर्षा आतील वाण हरभऱ्याची ७० रुपये प्रति किलो आहे. तर यामध्ये अनुदानित दर ४५ रुपये प्रति किलो आहे.हरभरा दहा वर्षांवरील वाणाची मूळ किंमत ७२ रुपये प्रति किलो आहे. यात अनुदान २० रुपये प्रति किलो असून अनुदानित दर ५२ रुपये प्रति किलो आहे. या योजनेत शेतकऱ्याला सात-बारा, आधारकार्ड घेऊन बॅग वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button