ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Samyukt Kisan Morcha | 26 जानेवारी कँडल मार्च, 13 फेब्रुवारी ‘दिल्ली चलो’; हक्कांसाठी रणसंग्राम, शेतकरी मागे हटणार नाही!

Samyukt Kisan Morcha | January 26 Candle March, February 13 ‘Delhi Chalo’; Battle for rights, farmers will not back down!

Samyukt Kisan Morcha | संयुक्त किसान मोर्चा आणि 18 शेतकरी संघटनांनी शनिवारी बर्नाळा येथे महापंचायतचे आयोजन केले होते. या महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी पिकांना किमान आधारभूत हमी (MSP) देणारा कायदा करावा आणि स्वामिनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याची मागणी केली आहे.

या महापंचायतीत शेतकऱ्यांनी सरकारला खालील मागण्या केल्या आहेत:

  • पिकांना किमान आधारभूत हमी (MSP) देणारा कायदा करावा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी.
  • शेतकऱ्यांना आणि मजूरांना कर्जमाफी द्यावी.
  • लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा.
  • वीजचे खाजगीकरण थांबवावे.
  • 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी.

वाचा : Maratha Reservation | शिरूरमध्ये आढळली मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद; मराठा आरक्षणासाठी लढा उधळला!

शेतकरी नेत्यांनी आरोप केला की, केंद्र सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले, त्या आधारावर दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण सरकारनं अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.

संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारीला चंदीगडमध्ये विचारवंतांच्या गटाची बैठक होणार आहे. त्याचबरोबर कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी रोजी देशभरात कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

या महापंचायतीत शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानीकडे ‘दिल्ली चलो’ मोर्चाची घोषणाही केली आहे.

Web Title | Samyukt Kisan Morcha | January 26 Candle March, February 13 ‘Delhi Chalo’; Battle for rights, farmers will not back down!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button