पिक विम्याचे 64 कोटी 7 लाख रुपये मंजूर; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा च्या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पिक विमा…
Rs 64 crore 7 lakh sanctioned for crop insurance; Farmers of 'Ya' district of Maharashtra will get comprehensive crop insurance
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020 खरीप हंगामा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्या करिता एकूण 64 कोटी 7 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.
येत्या 30 ऑगस्टपर्यंत या निधीचे वाटप करण्यात येईल ही रक्कम मंडळ निहाय वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील संग्रामपूर, जामोद आणि शेगाव तीन तालुके आणि 15 महसूल मंडळांचा यात समावेश आहे.
वाचा: PM Kisan चे 2000 रुपये मिळाले नाहीय? ‘या’ क्रमांकांवर नोंदवा तक्रार
रिलायन्स कंपनी ने केला मंजूर…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याआधी पीक विम्याची मागणी केली होती या मागणीला दाद देत रिलायन्स विमा कंपनीने 64 कोटी 7 लाख 21 हजार ही भरपाई रक्कम मंजूर केली, तसे पत्र कंपनीने दिल्याची माहिती स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिली असून वंचित शेतकऱ्यांसाठी लढा यापुढेही सुरू ठेवणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..