ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan Yojana | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना होळीचं गिफ्ट! शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेला फिक्सचं जमा होणार 13वा हप्ता..

PM Kisan Yojana | भारतात सणावारांना प्रचंड महत्व दिले जाते. आता होळी येणार आहे आणि देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी यंदाची होळी खास असणार आहे. खरं तर, प्रधानमंत्री किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 2000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 13व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या महिन्यात होळीपूर्वी किंवा 8 मार्चपर्यंत केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात.

कधी होईल 13 वा हप्ता जमा?
या योजनेचा 13 वा हप्ता 24 फेब्रुवारीलाच जारी केला जाऊ शकतो. खरं तर, चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये, 24 फेब्रुवारीलाच पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत यंदाही या योजनेचा 13वा हप्ता 24 फेब्रुवारीलाच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ई-केवायसी आहे आवश्यक
तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही आतापर्यंत तुमचे ई-केवायसी केले नसेल, तर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी तुमचे ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे. विशेष म्हणजे, सरकारने या योजनेत कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी म्हणजेच हेराफेरी टाळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाहीतर ते 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील. म्हणजेच 13व्या हप्त्याचे पैसे त्याच्या खात्यात येणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही शक्य तितक्या लवकर जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतः या योजनेसाठी ऑनलाइन ई-केवायसी करू शकता.

13 वा हप्ता मिळविण्यासाठी ई-केवायसी आवश्यक
या योजनेचे नियम बदलताना, सरकारने लाभार्थ्यांची खाती Know-Your-Customer (KYC) शी लिंक न करणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे केवायसी झाले नाही त्यांच्या खात्यात बाराव्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. तुम्ही तुमचे ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, अन्यथा 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

याप्रमाणे ई-केवायसी करा

  • पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक टाका.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
  • त्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • अशा प्रकारे ई-केवायसी केले जाते.

पीएम किसान योजना
खरं तर, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो. त्याच वेळी, सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसऱ्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करते. यानुसार, पीएम किसानचा 13 वा हप्ता या किंवा पुढील महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Fix update of PM Kisan! The 13th installment will be credited to the farmer’s account on date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button