योजना

Pipe Line Yojana | शेतकऱ्यांनो तुम्हाला पीव्हीसी पाईप योजनेचा मेसेज आला का? 7 दिवसांत पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया

Pipe Line Yojana | राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पीव्हीसी आणि एचडीपी पाईपसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणारी योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी या योजनेअंतर्गत पीव्हीसी आणि एचडीपी पाईप (Pipe Line Yojana) उपलब्ध करून दिले जातात. महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना आता मेसेज प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

7 दिवसांत आवश्यक कागदपत्रे करा अपलोड

महाडीबीटी पोर्टलवरील लॉटरी प्रक्रिया याआधी काही कारणामुळे अडचणीत होती. मात्र आता काही योजनांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात सिंचन विभागाच्या पाईपलाइन योजनेच्या लॉटरीची घोषणा केली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे, त्यांना पुढील 7 दिवसांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल.

PVC पाईपसाठी 100% आणि 50% अनुदान

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी 100% आणि 50% अनुदान दिले जाते. एसटी आणि एसटी वर्गातील शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते. तर, सामान्य गटातील शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर आणि एचडीपी पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर अनुदान मिळते. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 15,000 रुपये पर्यंतची मदत मिळू शकते.

आवश्यक कागदपत्रं कोणती?

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादीही दिली आहे. शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा उतारा आणि कोटेशन अपलोड करण्याची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळेल. त्या नंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करण्यासाठी सूचित केले जाईल. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, संबंधित शेतकऱ्यांना खरेदीचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असेल. योजना सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत मिळणे निश्चित आहे, ज्यामुळे शेतीला प्रगती होईल आणि पाणी वापराचे प्रमाण नियंत्रित होईल.

हेही वाचा :

मिथुन आणि तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा; आर्थिक लाभ अन् मिळणारं बढती, वाचा तुमच्या राशीची स्थिती

मार्चमध्ये कर्जत-जामखेड येथे 66व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button