Agriculture Tool Subsidy | शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी! आजच कृषी अवजारे अनुदानासाठी करा अर्ज, पाहा शेवटची तारीख
Agriculture Tool Subsidy | कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी उपकरणांवर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची संधी दिली आहे. शेतकऱ्यांना २८ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज (शेती अवजारे अनुदान) करण्याची अंतिम तारीख आहे. कृषि आयुक्तालयाच्या उपसंचालक सुस्मिता तवटे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. (Agriculture Tool Subsidy)
कृषी अवजारे अनुदान
अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर लॉगिन करून लक्ष्यांक भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अधिकृतपणे अर्ज करणे सुरू करण्यापूर्वी, संबंधित योजनेच्या विविध घटकांसाठी लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहेत. अन्न व पोषण सुरक्षितता योजनेत कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्यांसाठी सिंचन साधनांवर अनुदान उपलब्ध आहे. याशिवाय, बीज प्रक्रिया ड्रम, पौष्टिक तृणधान्यांसाठी पल्वरायझर आणि मनुष्यचलित टोकन यंत्र (डिबलर) यांसारख्या उपकरणांवर देखील अनुदान मिळवता येईल.
कृषी अवजारे अनुदानासाठी कसा कराल अर्ज?
शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ‘मॅकेनायझेशन’ आणि ‘इरिगेशन’ ह्या टाइल्सवर जाऊन अर्ज सादर करता येईल. अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या वेबसाइटवर लॉगिन करणे आवश्यक आहे. या पोर्टलवर संबंधित योजना व उपकरणांबाबत माहिती सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर शेतकऱ्यांनी आपले खाते तयार करून लॉगिन करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्यास, संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सूचनाही देण्यात आली आहे.
तसेच, कृषी विभागाने शेतकऱ्यांना याद्वारे कृषी यंत्रसामग्री मिळवून त्यांच्या उत्पादन क्षमता व उत्पादन वाढवण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या कृषी उत्पादनात सुधारणा करता येईल.
हेही वाचा:
• शुभ योग तयार फळ ‘या’ चार राशींना अचानक लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती काय?